मृदा

प्रयोग

views

3:23
प्रयोग: मुलांनो, तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. त्यासाठी प्रथम मातीच्या दोन टेकडया तयार करा. त्या तयार केल्यावर एका टेकडीवर गहू किंवा कोणतेही रोपे उगवेल असे बी टाकून घ्या. नंतर चार ते पाच दिवस त्या बी टाकलेल्या टेकडीवर थोडे थोडे पाणी टाकत राहा. ही कृती केल्यानंतर काय दिसते ते पाहा. ज्या टेकडीवर रोपे उगवलेली आहेत त्या टेकडीवरील रोपांच्या मुळांनी मृदा पकडून ठेवलेली असते. त्यामुळे झारीने पाणी टाकले तरी त्या टेकडीवर फारसा फरक पडत नाही. तर दुसऱ्या टेकडीवरील मृदेचे कण हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या टेकडीवर झारीने पाणी टाकले तर तेथील मृदा पाण्यासोबत वाहते. भूपुष्ठावरील मातीचे कण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे म्हणजेच त्या जमिनीची धूप होणे होय. मृदेची धूप : पावसाच्या पाण्याबरोबर, नदयांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते. मृदेची अवनती: मुलांनो, पाहा या चित्रात तुम्हाला जमिनीवरील मृदेला सगळीकडे तडे गेलेले दिसून येते आहे. काही कारणांमुळे मृदेचे आरोग्य बिघडते. यालाच मृदेची अवनती होणे असे म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायनाच्या आणि खतांच्या अतिरेकी वापरामुळे मृदेची अवनती घडून येते.