ऋतूनिर्मिती भाग २

भौगोलिक स्पष्टीकरण

views

4:50
भौगोलिक स्पष्टीकरण :- मुलांनो, आपण पाहिलेल्या आकृतीचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येते की, पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो; तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील २३० ३०’ (२३ अंश ३० मिनिटे) अक्षवृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. २१ जून किंवा चित्र ‘अ’ मध्ये उत्तर ध्रुव सूर्याकडे कललेला आहे. आकृतीत दाखविल्याप्रमाणे २१ जून आणि २२ डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात. या दिवसांना ‘अयनदिन’ असे म्हणतात. आपण ऋतू ठरविताना सूर्यदर्शनाचा काळ, अयनस्थिती, संपातस्थिती यांचा विचार केला आहे. विषुववृत्तीय प्रदेशात ऋतुबदल जाणवत नाहीत, त्यामुळे तेथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही. मात्र दोन्ही गोलार्धात म्हणजे उत्तर व दक्षिण गोलार्धात विशिष्ट काळात दरवर्षी उन्हाळा व हिवाळा ऋतू होतात. वर्षभराच्या काळात ते एकामागून एक येत असतात, त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होते. उदा. आपल्या भारत देशात 1. उन्हाळा 2.पावसाळा 3. परतीचा मान्सून 4.हिवाळा असे चार ऋतू मानले जातात. तर युरोप व उत्तर अमेरिका खंडात उन्हाळा (summer),शरद (Autumn), हिवाळा (Winter),वसंत (Spring) असे चार ऋतू मानतात. वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे ऋतू मानत असले तरी संपूर्ण पृथ्वीवर साधारणपणे उन्हाळा व हिवाळा हे दोनच ऋतू आपल्याला दिसतात.