मानवी वस्ती

विखुरलेली वस्ती

views

3:34
विखुरलेली वस्ती : मुलांनो, या चित्रात आपल्याला विखुरलेल्या वस्ती दिसत आहे. या विखुरलेल्या वस्तीत घरे दूरदूर असतात. तसेच या वस्तीतील घरांची संख्यादेखील कमी असते. सामान्यपणे याप्रकारची वस्ती उंचसखल प्रदेश, घनदाट जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट तसेच विस्तृत कृषिक्षेत्र असलेल्या ठिकाणी आढळते. या प्रकारे विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. केंद्रित वस्ती : केंद्रित वस्ती आपल्याला ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्यांजवळ पाहायला मिळते. तुम्हाला माहीत आहे का, राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. सामान्यतः सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र इत्यादी कारणांमुळेदेखील या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या वस्ती आपल्याला ग्रामीण आणि नागरी भागात पहायला मिळतात.