कृषी

प्रस्तावना

views

4:18
प्रस्तावना :- मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की, आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. हा व्यवसाय करत असताना मानवाला वेगवेगळ्या कल्पना सुचल्या. मानव पारंपरिक कृषी पद्धतीकडून आधुनिक कृषी पद्धतीकडे कशी वाटचाल करू लागला, हा व्यवसाय करत असताना त्याला वेगवेगळे उद्योगधंदे कसे उपलब्ध झाले या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करूया. भौगोलिक स्पष्टीकरण: शेतकरी त्याच्या उदरनिर्वाहासाठी शेळ्या, गाई – म्हशी, कोंबड्या पाळतो. मुलांनो, कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे. कृषिव्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो. तसेच शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे; त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाश्या पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन, वराहपालन, एमूपालन इत्यादी व्यवसायांचाही कृषीमध्ये समावेश होतो. कृषिव्यवसायात मनुष्यबळ, प्राणी, अवजारे, तसेच इतर विविध साधने व अत्याधुनिक तंत्रज्ञान या घटकांचा वापर केला जातो.