कृषी

कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय

views

4:34
कृषी या सदराखाली येणारे व्यवसाय: आता आपण कृषीक्षेत्रात येणाऱ्या विविध व्यवसायांची ओळख करून घेऊया. तसेच या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पादनांचा आपल्या रोजच्या जीवनात कसा वापर होतो, ते पाहूया. पशुपालन :- या विभागात शेतीसाठी महत्त्वाचा असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन होय. गुरेपालन :- गुरेपालन हा मिश्र शेतीचा अविभाज्य भाग आहे. गाय, म्हैस, बैल, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. शेळीपालन व मेंढीपालन :- शेळीपालन व मेंढीपालन हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळीपालन व मेंढीपालन हे व्यवसाय डोंगराळ, निमओसाड, कोरड्या हवामान प्रदेशात केले जातात. कुक्कुटपालन :- केवळ शेतीव्यवसायपूरक जोडधंदा असे या व्यवसायाचे आजचे स्वरूप राहिलेले नाही, तर भरपूर भांडवलाची गुंतवणूक करून मोठे उत्पन्न मिळवून देणारा एक स्वतंत्र धंदा म्हणून आजकाल त्याच्याकडे पाहिले जात आहे. मधमाशीपालन : मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करू शकतात.