कृषी

मत्स्यपालन

views

4:37
मत्स्यपालन : मत्स्यशेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. त्यात पाणी साठवले जाते. या तळ्यांत माशांची अंडी आणून सोडतात. आणि त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करतात. एकाच प्रकारच्या माशांची पैदास करणे खुल्या समुद्रात कठीण असते. कारण तेथे जाळ्यामध्ये विविध प्रकारचे मासे अडकतात. ते सर्व मासे वेगवेगळे करावे लागतात. रेशीम शेती : रेशीम किडे म्हणजे ज्या किड्यापासून रेशीमधागे मिळतात ते किडे होत. रेशीम किड्यांच्या कोशापासून उच्च प्रतीचा रेशीम धागा मिळतो. हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र तयार करता येते. रोपवाटिका व्यवसाय: गेल्या काही वर्षात फुलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेती असे शेतीशी निगडित, परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे. हरितगृहातील शेती : कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर करून शेती केली जाते. हरितगृहामध्ये वातावरणातील सूर्यप्रकाश, तापमान, कार्बन डायऑक्साइड, आद्रता, वायुविजन हे पाच घटक नियंत्रित केले जातात. लिली, जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्त्वावर हरितगृहांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच याचा उपयोग आपल्या पिकांचे संशोधन व विकास करण्यासाठी तसेच शोभिवंत रोपांची वाटिका तयार करण्यासाठी देखील होतो.