कृषी

शेतीचे प्रकार

views

5:08
शेतीचे प्रकार :- मुलांनो, आपल्याला तर हे माहीतच आहे की पिके व शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना या वर अवलंबून असतात. मुलांनो शेतीचे प्रमुख दोन प्रकार आहेत: निर्वाह शेती आणि व्यापारी शेती निर्वाह शेती : निर्वाह शेती म्हणजे ज्या शेतीतून आपला उदरनिर्वाह होईल त्या प्रकारच्या शेतीला निर्वाह शेती म्हणतात. तर याच सखोल शेतीची आपण थोडक्यात माहिती घेऊ. सखोल शेती : सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. ही शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशांत आढळते. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात हा शेतीप्रकार बघायला मिळतो. या शेतीमध्ये प्राणिज उर्जेचा वापर जास्त केला जातो. स्थलांतरित शेती :- स्थलांतरित शेती म्हणजेच भटकी शेती होय. स्थलांतरित शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. या शेतीत प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते. ही शेती करणाऱ्या लोकांना अन्नासाठी शेतीबरोबर इतर उद्दोगही करावे लागतात. या स्थलांतरीत शेती पद्धतीत माणूस सर्वप्रथम वनाच्या जमिनीच्या तुकड्याची निवड करतो.