कृषी

व्यापारी शेती

views

4:45
व्यापारी शेती :- व्यापारी शेती हा शेतीचा दुसरा मुख्य प्रकार आहे. या शेतीचे विस्तृत शेती, मळ्याची शेती व मंडई (बागायती) असे उपप्रकार पडतात. त्यांची आता आपण माहिती घेऊ. विस्तृत शेती :- विस्तृत शेतीसाठी शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असावे लागते. प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्रांच्या साहाय्याने ही शेती केली जाते. एकपीक पद्धत हे या शेतीचे ठळक वैशिष्टय आहे. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते. मळ्याची शेती ;- मळ्याच्या शेतीचे क्षेत्र प्रामुख्याने डोंगरउतारावर असते. त्यामुळे या शेतीत यंत्रांचा फारसा उपयोग होत नसून स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. एकपीक पदधत हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. ही शेती प्रामुख्याने उष्ण कटिबंधात केली जाते. मंडई बागायती शेती :- हा शेतीचा आधुनिक प्रकार आहे. या प्रकारच्या शेतीत, शेतमालाच्या मागणीनुसार शहराजवळच्या भागांत शेतकरी भाजीपाला पिकवतात. मागणी तसा पुरवठा या नियमानुसार ही शेती केली जाते. मंडई बागायती शेतीचे फलोद्यान व फूलशेती असे दोन उपप्रकार पडतात; या शेतीचा आकार लहान असतो. कारण आपल्याला तर माहीतच आहे की, शेतातील माल हा ठरावीक काळानंतर खराब होतो. म्हणून मग तो वेळेत बाजारपेठेत पोहचणे गरजेचे असते. म्हणून या शेतीला ‘ट्रकशेती’ (Truckfarming) असेही म्हणतात.