कृषी

विपणन व्यवस्था

views

4:30
विपणन व्यवस्था : विपणनाचा अर्थ सांगायचा झाल्यास ग्राहकाच्या दृष्टीने विपणन म्हणजे वस्तूंची खरेदी करणे होय. त्याचप्रमाणे कारखानदार व विक्रेत्याच्या दृष्टीने विपणन म्हणजे वस्तू व सेवांच्या विक्रीची क्रिया होय. विपणन म्हणजे एक व्यापक स्वरूपाचे कार्य, सतत चालू असणारी क्रिया होय. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत हा ग्राहकांपर्यत पोहचविण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशातील विपणन व्यवस्थेचे महत्त्व अधिकच आहे. 1. विखुरलेली शेती, 2. असंघटित शेतकरी, 3. शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, 4. शेतमालाचे नाशवंत स्वरूप त्यासाठी अत्याधुनिक विपणन व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरते. इस्त्राईलमधील शेतीप्रकारची माहिती घेऊया. इस्त्राईल हा विविध शेती उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे. तेथील प्रतिकूल हवामान, अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेले वाळवंट, पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इस्त्राईलने आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. इस्त्राईलमध्ये भूभागातील पाण्यासाठी दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत. यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील झरे आणि दुसरा पर्वतीय विभागातील झ-यातून पाणीसाठा तयार केला जातो. भारतातील अनेक मंडळी प्रगत शेती पाहण्यासाठी इस्त्राईलमध्ये भेट देत असतात.