समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

प्रस्तावना

views

4:01
प्रस्तावना: मुलांनो आपण नकाशा बघतो त्यावेळी आपल्याला नकाशावरती दऱ्या, डोंगर, पर्वत, पठारे, मैदाने अशी अनेक भूरूपे पाहायला मिळतात. प्रत्यक्ष पृथ्वीवरती त्यांची उंची, खोली, रुंदी ही तर जास्त असते. परंतु, नकाशावरती ते दाखविणे शक्य नसते. मग तरीसुद्धा आपल्याला त्यांची उंची, खोली कशी समजते? या विषयीची थोडक्यात माहिती आपण इयत्ता पाचवीत घेतलीच आहे. त्याची आणखी थोडी माहिती आपण एक कृती करून तिच्या मदतीने घेणार आहोत. • करून पहा / कृती : प्रथम एक लांबटगोल आकाराचा मोठा बटाटा घ्या. त्याबरोबर पेन, चाकू, कागद, मोजपट्टी, टूथपिक हे साहित्य घ्या. बटाटा समोरून पाहिल्यास कसा दिसतो आणि वरून पाहिल्यास कसा दिसतो याचे निरीक्षण करा. बटाटा आडवा हातात धरून चाकूच्या साहाय्याने त्याचे दोन भाग करा. म्हणजे त्याचा सपाट तळ दिसेल. आता कापलेला बटाटयाचा तळ टेबलावर ठेवून त्याची उंची मिमी मध्ये मोजा. ती उंची आपल्या नोंदवहीत नोंदवा. मुलांनो, कागदावर ठेवलेला बटाटा हा पर्वत आहे असे समजा. बटाटयाची निमुळती बाजू म्हणजे पर्वताचे शिखर असलेला भाग होय.