समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे

जरा डोके चालवा!

views

2:47
मुलांनो, जेव्हा तुम्ही एखादे भूरूप समोच्च रेषांच्या आधारे पाहता, तेव्हा त्या भूरूपाकडे तुम्ही वरून पाहता. या नकाशात समोच्च रेषांच्या साहाय्याने एक टेकडी दाखवली आहे. या टेकडीकडे आपण वरून पाहतो. या आधीच्या नकाशात जसे आपण प्रतिकृती व समोच्च रेषा नकाशा याद्वारे भूरूपांची माहिती घेतली, तशाच प्रकारची माहिती आपण या दोन आकृतींतून घेणार आहोत, परंतु, यात फरक आहे. तो म्हणजे या ठिकाणी भूरूपांची नावे, प्रदेशांची नावे व दिशा दर्शविल्या आहेत. परंतु उतार, उंची हा भाग दर्शविला नाही. या आकृती मध्ये एक प्रतिकृती दिली आहे. प्रतिकृतीमधील उत्तर भाग मुळा-मुठा नदयांच्या खोऱ्याचा भाग आहे. त्यानंतर कात्रज-दिवेघाट ही डोंगररांग पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेली दिसते आहे. त्याच्या पलीकडे कऱ्हा नदीच्या खोऱ्याचा काही भाग आपल्याला दिसतो आहे. मुलांनो, वरील प्रतिकृती व नकाशा यांचे बारकाईने निरीक्षण करा आणि माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या. वरील प्रश्नांची उत्तरे शोधत असताना तुम्ही अतिशय बारकाईने दोन्ही आकृतींचे निरीक्षण केल्यामुळे समोच्च रेषांद्वारे भूरूपे कशी ओळखायची हे तुम्हाला समजले.