बल व दाब

दाब

views

3:51
आता आपण ‘दाब’ ही संकल्पना काय आहे ते पाहूया. तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनांच्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना पाहिले असेल. हवा भरण्याच्या यंत्रावर दाब दर्शविणारी तबकडी असते. किंवा ‘डिजिटल मीटरवर दाबाचे आकडे दिसतात. त्या यंत्राच्या मदतीने टायरमधील दाब वाढवला जातो. तुम्ही सायकलच्या टायरमध्ये हातपंपाने हवा भरताना पाहिले असेल. त्या पंपाच्या मदतीने बल लावून टायरमध्ये हवा भरली जाते. म्हणजेच बल आणि दाब यांचा काही संबंध आहे का? हे समजण्यासाठी आपण एक कृती करून पाहूया. त्यासाठी काही खिळे घ्या. हे खिळे टोकदार दिशेने लाकडाच्या फळीमध्ये हातोडीच्या साहाय्याने ठोका. पाहा, खिळे लाकडाच्या फळीत सहजपणे घुसले. आता त्यातीलच एखादा खिळा घेऊन तो डोक्याच्या बाजूने फळीवर ठेवून टोकाच्या बाजूवर हातोडीने ठोकायचा प्रयत्न करा. पाहिलंत, आता डोक्याच्या बाजूने खिळा फळीत घुसत नाही. ड्रॉईंगबोर्डवर पिना टोचताना त्या सहज टोचल्या जातात. आपल्या अंगठ्याने बल लावून आपण पिना टोचू शकतो. याउलट लहान टोकाची टाचणी ड्रॉईंगबोर्डवर टोचताना अंगठ्याला इजा होण्याची शक्यता असते. यातून आपल्याला असे समजते की खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडात सहज घुसतो. म्हणजेच बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीत ठोकणे सोपे आहे. ‘दाब’ ही अदिश राशी आहे. दाबाची व्याख्या आपल्याला पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. ‘एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लंब दिशेत क्रिया करणाऱ्या बलाच्या परिणामाला त्या पृष्ठभागांवरील दाब असे म्हणतात’. म्हणून दाब=बल/(ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ)