मानवनिर्मित पदार्थ

प्लॅस्टिकचे गुणधर्म

views

4:13
प्लॅस्टिक गंजत नाही. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. प्लॅस्टिकवर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस यांचा सहजासहजी परिणाम होत नाही. प्लॅस्टिकपासून विविध रंगांच्या वस्तू बनवता येतात. ते वजनाने हलके असते. आकार्यता या गुणधर्मामुळे त्याला कोणताही आकार देता येतो. प्लॅस्टिक उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक आहे. हे प्लॅस्टिकचे गुणधर्म आहेत. थर्मोप्लॅस्टिकचे प्रकार: पॉलीविनाईल क्लोराइड(PVC), पॉलीस्टाइरीन(PS), पॉलीइथिलीन(PE), पॉलीप्रोपिलीन(PP) हे सर्व थर्मोप्लॅस्टिकचे प्रकार आहेत. थर्मोसेटिंग प्लॅस्टिकचे प्रकार: बॅकेलाईट, मेलेमाईन, पॉलीयुरेथेन आणि पॉलीइस्टर हे थर्मोसेटिंग प्लॅस्टिकचे प्रकार आहेत.