सजीवांमधील जीवनक्रिया

वनस्पतींमधील अन्न आणि इतर पदार्थाचे परिवहन

views

05:36
वनस्पतीतील पदार्थाचे स्थानांतरण म्हणजे पानांमध्ये तयार झालेले अन्न प्रत्येक पेशीकडे पोहचवणे. उदा. अमिनो आम्ले सोडून जास्तीचे अन्न- फळे, मूळ आणि बियांमध्ये साठवणे. या क्रियेला पदार्थांचे स्थानांतरण म्हणतात. ही स्थानांतरणाची क्रिया दोन दिशांमध्ये म्हणजेच रसवाहिन्यांमार्फत वरील दिशेने तसेच खालील दिशेने केली जाते. पदार्थाचे स्थलांतर ही साधी भौतिक क्रिया नाही, तर तिला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा ATP पासून मिळते. जेव्हा सुक्रोजसारख्या अन्नद्रव्याचे रसवाहिनीमार्फत ATP च्या साहाय्याने वहन केले जाते तेव्हा त्या भागातील पाण्याची संहती कमी होते. यामुळे परासरण क्रियेमार्फत पाणी पेशीच्या आत शिरते. पेशीतील घटकांमध्ये वाढ झाल्यामुळे पेशीच्या भित्तिकेवरील दाब वाढतो. त्यामुळे अन्नद्रव्य कमी दाबाच्या पेशींमध्ये ढकलले जाते. ही क्रिया रसवाहिनीला वनस्पतीच्या आवश्यकतेनुसार द्रव्याचे वहन करण्यास मदत करते. ज्यावेळेस फुले येण्याचा हंगाम येतो तेव्हा मुळांमध्ये किंवा खोडांमध्ये साठवून ठेवलेली ‘शर्करा’ कळ्यांचे फुलात रूपांतर करण्यासाठी कळ्यांमध्ये पाठवली जाते. अशा प्रकारे वनस्पतींमध्ये अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन होते. आता आपण ‘उत्सर्जन’ या क्रियेविषयी माहिती घेऊ.