ध्वनी

ध्वनी कसा ऐकू येतो?

views

3:11
ध्वनीच्या स्रोताभोवती हवा असते. या स्रोतामुळे हवेचे कंपन होते. ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरत जाते. या लाटेलाच ‘ध्वनिलहर’ असे म्हणतात. या ध्वनीलहरी आपल्या कानांपर्यंत पोहोचतात. कानातील पडदा नाजूक असतो. त्यामुळे तो कंपन पावतो. या कंपनामुळे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूंद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी म्हणजेच आवाज ऐकू येतो.