मौर्यकालीन भारत

मौर्यकालीन कला आणि साहित्य

views

3:11
सम्राट अशोकाने सारनाथ आणि कुशीनगर सारख्या धार्मिक स्थळांमध्ये स्तूप आणि विहार बनविले. मौर्यकालीन स्तंभालेख आजही सारनाथ, अलाहाबाद, मेरठ, वाराणसी येथे आहेत. मौर्यकलेचे महान व नवीन रूपाचे दर्शन या स्तंभात पाहायला मिळते. सारनाथ येथील मूर्ती ही शिल्प व वास्तू मौर्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विनसेन्ट नावाचा प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो, की कोणत्याही देशातील प्राचीन कलेपैकी सारनाथ येथील मूर्तीकला ही अति उच्च दर्जाची आहे. यावरून मौर्यकालीन शिल्पकलेचे सौंदर्य समजते. अशोकाने उभारलेला ध्वजस्तंभ एका पाषाणात घडविलेला गोल स्तंभ असून त्यांची उंची बारा मीटर इतकी होती. या स्तंभांच्या माथ्यावर सिंह, हत्ती, बैल, घोडा यांसारख्या प्राण्यांची उत्तम शिल्पे आहेत. सारनाथच्या स्तंभावर एकमेकाकडे पाठ करून खेटून उभे असलेले चार सिंह आहेत. पण जर आपण समोरून बघितले तर आपल्याला त्यातील तीनच सिंह दिसतात. या सिंहाच्या मूर्ती अतिशय वेधक ठरतात. सिंहांच्या पायाशी असलेल्या तबकडीवरच हत्ती, घोडे इ.प्राणी अगदी सहज हालचाल करताना दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. म्हणजेच आपल्या नाण्यांवर, नोटांवर तसेच भारताचा आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा इतर शासकीय गोष्टींवर या अशोकस्तंभावरील हे सिंहाचे चित्र असते. तसेच अशोकस्तंभावर असणारे चक्र हे अशोकचक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर म्हणजे तिरंग्यावर निळ्या रंगात असते. त्या चक्रात २४ रेषा आहेत.