इतिहासाची साधने

मौखिक साधने

views

3:9
""मौखिक साधने—मौखिक म्हणजे मुखाने म्हणजेच तोंडाने संगितली गेलेली गोष्ट. यामध्ये जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांचा समावेश होतो. यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. ही साधने लिहून ठेवलेली नसतात. किंवा ती डोळ्यांना दिसत नाहीत. तर ती लोकपरंपरेतून एका पिढीकढून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. उदा. शिवाजी महाराजांवर रचलेले पोवाडे. तानाजीचा पोवाडा हा असाच एक मौखिक साधनांतील सुप्रसिद्ध पोवाडा आहे. हा पोवाडा तुळशीदास शाहिरांनी लिहिला आहे. या पोवाड्यामध्ये त्यांनी सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन केले आहे. या पोवाड्यात त्यांनी तानाजी, शेलारमामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे सांगितली आहेत. मामा बोलाया तो लागला l ऐंशी वर्षींचा म्हातारा ll “ लगीन राहिले रायबाचे तो मजला सांगावी ll माझ्या तानाजी सुभेदारा l जे गेले सिंहगडाला ll त्याचे पाठीरे पाहिले l नाही पुढारे पाहिले ll ज्याने आंबारे खाईला l बाठा बुजरा लाविला ll किल्ला हाती नाही आला l त्याचे झाड होऊनी आंबे बांधले ll काढू नको तानाजी सुभेदारा l सिंहगड किल्ल्याची वार्ता ll जे गेले सिंहगडाला l ते मरुनशानी गेले ll तुमचा सपाटा होईल l असे बोलू नको रे मामा ll आम्ही सूरमर्द क्षत्री l नाही भिणार मरणाला ll""