विभाज्यता

सरावासाठी गणित

views

2:43
शि: मुलांनो, आता मी सरावासाठी तुम्हाला असे गणित देते की ज्या मध्ये आपल्याला तीनही संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या सांगाव्या लागतील. मग करूयात सुरवात ? वि: हो बाई शि: समजा, एका बागेत काही फुलझाडे आहेत. एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत. त्या बागेत तीन विद्यार्थी परडी घेऊन फूले तोडायला गेले. परडीवर 3, 4, 9 यापैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडतो. एका झाडावरून एकच फूल तो घेतो. मग सांगा बरं ! प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुले असतील? या फुलांवरील संख्या अशा आहेत : 111, 369, 435, 249, 666, 450, 960, 432, 999, 72, 336, 90, 123, 108, 432, 220, 356. चला सुरवात करा. वि: सर 3 नंबरची परडी घेतलेली मुलगी यामधील संख्या 111, 369, 435, 249, 666, 450, 960, 432, 999, 72, 336, 90, 123, 108. फुले तोडेल. कारण यातील प्रत्येक संख्येच्या अंकांची बेरीज केली असता, त्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो. शि : शाब्बास, आता 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्या कोण सांगेल? वि : सर मी सांगते. 4 नंबरची परडी घेतलेला मुलगा 356, 220, 432, 960, 72, 336, 108 या संख्यांची फुले तोडेल. कारण या सर्व संख्यांतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेल्या संख्यांना 4 ने पूर्ण भाग जातो. शि : अगदी बरोबर ! 9 ने विभाज्य असणाऱ्या संख्या कोण सांगेल? वि : 9 नंबरची परडी घेतलेली मुलगी 369, 666 ,450, 432, 999, 72, 90, 108. या संख्यांची फुले तोडेल. कारण यातील प्रत्येक संख्येच्या अंकांची बेरीज केली असता, त्या बेरजेला 9 ने पूर्ण भाग जातो शि: अगदी बरोबर !