नफा – तोटा

नफा – तोट्या ची उदाहरणे सोडवू

views

3:31
आपण आणखी काही नफा – तोट्या ची उदाहरणे सोडवू. उदाहरण 1) विजय कपडे विक्रेता आहे. त्याने आपल्या दुकानासाठी शर्ट 2000रू., टीशर्ट 2500रू आणि पँन्ट 5000 रु. असे एकूण 9500 रुपयांचे कपडे खरेदी केले. या मालाची विक्री करून विजयकडे एकूण रु 8000 जमा झाले. तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा ? आणि किती झाला? शि: पहा, विजयने खरेदी केलेला एकूण माल रू.9500 चा आहे. आणि त्याने विक्री केलेल्या मालाची किंमत आहे रू.8000/. म्हणजे यामध्ये खरेदीची किंमत जास्त आहे. म्हणजेच विजयला तोटा झाला आहे. हा तोटा किती आहे ते पहा: तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत = 9500 – 8000 = 1500 रू. म्हणून विजयला कपड्याच्या व्यवहारात 1500 रुपये तोटा झाला आहे. उदाहरण 2) प्रमोदने घाऊक बाजारातून मेथीच्या 100 जुड्या 400 रुपयांना खरेदी केल्या. अचानक आलेल्या पावसामुळे त्याच्या हातगाडीवरील 30 जुड्या भिजून खराब झाल्या. उरलेल्या जुड्या 5 रुपयांना एक याप्रमाणे विकल्या तर त्याला नफा झाला की तोटा ? आणि तो किती झाला? शि: मुलांनो, या उदाहरणामध्ये प्रमोदने खरेदी केलेल्या मेथीच्या 100 जुड्यांची खरेदी किमंत आहे रु 400 . पण या 100 जुड्यांपैकी 30 जुड्या खराब झाल्या. म्हणजेच 100 – 30 = 70 जुड्या शिल्लक राहिल्या. आता त्याच्याजवळ विकण्यासाठी 70 जुड्या आहेत. या 70 जुड्या प्रमोदने प्रत्येकी रु 5 प्रमाणे विकल्या आहेत.म्हणून 70 जुड्याची विक्री किमंत = 70 × 5 = 350 रू. म्हणजे प्रमोदची खरेदी किंमत आहे रु 400 आणि विक्री किंमत आहे रु 350. म्हणजे खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा मोठी आहे. म्हणून याठिकाणी प्रमोदला तोटा झाला आहे. हा तोटा किती ते पहा: तोटा = खरेदी किंमत – विक्री किंमत = 400 – 350 = 50 रू. म्हणून प्रमोदला मेथीच्या भाजीच्या विक्रीमध्ये रू.50 तोटा झाला.