शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

शिवाजी महाराज

views

2:35
शिवाजी महाराजांनी निजामशाहा आणि आदिलशाहा यांचा जुलमी कारभार तसेच वतनदारांकडून प्रजेकडे होणारे दुर्लक्ष हे सारे पाहिले. आणि त्यांनी मनाशी विचार केला जर प्रजेला या अन्यायातून बाहेर काढायचे असेल, प्रजेला सुखी करायचे असेल तर आपल्याला स्वराज्य स्थापन केले पाहिजे. स्वराज्यात आपण आपल्या प्रजेला सुखी करू शकतो. म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापण्याचे पवित्र कार्य हाती घेतले. त्यांनी वतनासाठी भांडणाऱ्या वतनदारांना वठणीवर आणले. आणि त्याच वतनदारांचा स्वराज्य निर्माण करण्यासाठी उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सुलतानांशी व मुघल सत्ताधीशांशी त्यांनी झुंज दिली. त्यांनी अनेक लढाया, स्वाऱ्या करून त्यांना सळो की पळो करून सोडले. प्रजेवर, जुलूम, अत्याचार करणाऱ्या, तिची लूट करणाऱ्या राजवटींचा त्यांनी पराभव केला. सर्वांना समान न्याय देणारे हिंदू राजाचे ‘’हिंदवी स्वराज्य’’ त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते. स्वराज्याचे राजे हे जरी धर्माने हिंदू असले तरी त्यांनी स्वराज्यात हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. त्यांना आदराची वागणूक दिली.