वनस्पतींचे वर्गीकरण

ब्रायोफायटा, टेरिडोफायटा

views

4:02
ब्रायोफायटा या गटातील वनस्पतीं अतिशय लहान व नाजूक असतात. त्यांना खरी मुळे, खोडे व पान नसतात. पण मुळांसारखे अवयव असतात. त्यांना ‘मुलाभ’ म्हणतात.या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे ‘उभयचर’ म्हटले जाते. कारण या वनस्पती ओलसर मातीत वाढत असतात. परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती जमिनीच्या आधाराने वाढतात किंवा त्यांना छोटेसे खोड व बारीक पाने असतात. त्या निन्मस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. यातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनी सारखी लांब असते. यांच्यात पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ठ ऊती नसतात. उदा. मॉस म्हणजे (फ्युनारीआ), मर्केशिया, अन्थॉसिरॉस, रिक्सिया इत्यादी. टेरिडोफायटा गटातील वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान असे स्पष्ट अवयव दिसतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. या वनस्पतीमध्ये जलवाहिन्या व रसवाहिन्या असतात. मात्र यांना फुले-फळे येत नाहीत. पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे त्यांचे प्रजनन होते. पानाच्या खालच्या बाजूला तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या ठिपक्यांमध्ये बीजाणू असतात. यांच्यामध्ये प्रजनन होत असते. उदा. फर्न्स - नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, टेरीस, एडीअँटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम, इत्यादी.