आर्थिक विकास

उपाययोजना

views

3:40
उपाययोजना :- सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी.व्ही. नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहन सिंगासारख्या तज्ञ अर्थशास्त्रज्ञांना अर्थमंत्री पदावर नेमले. मुलांनो, डॉ. मनमोहन यांचे अर्थमंत्री असतानाचे कार्य हे नेहमीच महत्वाचे राहिले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रथम अर्थव्यवस्थेतील दोष शोधून ते दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना केल्या. आणि परिस्थिती बदलण्यास सुरूवात झाली. डॉ. मनमोहन सिंगांनी परकीय गुंतवणुकीला वाव देण्यासाठी त्यावर असणारी बंधने उठविली. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती फक्त १८ उद्योगांपुरती मर्यादित केली. इतर उद्योगांना परवान्यामध्ये सूट, परवाना पद्धती अधिक सोपी व सुलभ करण्यात आली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खासगी उद्योगांकरिता खुली केली. त्यामुळे कार्यक्षमता वाढून तुटीचे उद्योग नफ्यात येऊ लागले. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी ३१ मार्च १९९२ मध्ये सेबीची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय मुंबईला आहे. कोलकाता, दिल्ली, चैन्नई येथे सेबीची विभागीय कार्यालये आहेत. सेबी म्हणजे securities and exchange बोर्ड ऑफ इंडिया होय. सेबी ही गुंतवणूकदार व ज्यात गुंतवणूक केल्या आहेत, अशा संस्था यांच्यात मध्यस्थीची भूमिका करते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. या सर्व उपायांमुळे भारतावरील आर्थिक मंदीचे सावट दूर झाले.