आम्ल, आम्लारी व क्षार

अधातुंच्या ऑक्साइडबरोबर आम्लारींची अभिक्रिया

views

05:04
अधातूंच्या ऑक्साइडबरोबर आम्लारींची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात. त्यामुळे अधातूंची ऑक्साइड ही आम्लधर्मी आहेत असे म्हणतात.झिंक ऑक्साइडची सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट (Na2ZnO2) व पाणी तयार होते. त्याचप्रमाणे अल्युमिनियम ऑक्साइडची सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम अल्युमिनेट (NaALO2) व पाणी तयार होते. हे आपल्याला या समीकरणातून दिसून येते. झिंक ऑक्साइड ZnO(s) + सोडियम हायड्रॉक्साइड 2NaOH(aq), सोडियम झिंकेट Na2ZnO2(aq) + पाणी H2O (1)अल्युमिनियम ऑक्साइड Al2O3 + सोडियम हायड्रॉक्साइड 2NaOH सोडियम अल्युमिनेट 2NaAlO2 + पाणी H2Oवरील दोन्ही अभिक्रियांवरून अल्युमिनियम ऑक्साइड Al2O3 व झिंक ऑक्साइड ZnO ही ऑक्साइड आम्लधर्मी आहेत, तसेच ते आम्लारीसुद्धा आहेत. म्हणजेच हे उभयधर्मी आहेत. तर जी ऑक्साइड्स आम्लधर्मी आणि आम्लारिधर्मी गुणधर्म दर्शवतात त्यांना उभयधर्मी ऑक्साइड्स म्हणतात.