नकाशा : आपला सोबती

नकाशा पद्धती

views

3:42
आपण जेव्हा कागदावर नकाशे काढतो, त्यावेळी भूरचनेची लांबी व रूंदी आपल्याला सहज दाखवता येते. परंतु भूरचनेची खोली व उंची सहजपणे दाखवता येत नाही. नकाशात या बाबी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. त्या पद्धती पुढीलप्रमाणे आlहेत: समोच्च रेषा पद्धती (contour line methodcontoumethod) रंगपद्धती (Layer Tinting Metlayer elevation model hod) उठावदर्शक आराखडा (Digital elevation model) या तीन पद्धतींनी जमिनीचा उंचसखलपणा किंवा प्रदेशाची उंची व खोली दर्शविली जाते. प्रत्येक पद्धतीची सविस्तर माहिती आपण आता घेणार आहोत: १.समोच्च रेषा पद्धती :- समोच्च म्हणजे समान उंची असलेली ठिकाणे. अशी समान उंचीवरील ठिकाणे जोडण्यासाठी वापरलेल्या रेषांना समोच्च रेषा असे म्हणतात. या पद्धतीचा वापर नकाशामध्ये जमिनीचा उंचसखलपणा दाखवण्यासाठी करतात. मुलांनो आपल्याला माहीत आहे की जमिनीची उंची समुद्रसपाटीपासून मोजतात. समुद्रसपाटीपासून समान उंचीवर असलेली समान उंचीची ठिकाणे प्रथम निश्चित केली जातात. नकाशात त्यांची नोंद योग्य ठिकाणी केली जाते. नकाशावर नोंदवलेली ही ठिकाणे रेषेच्या साहाय्याने एकमेकांस जोडतात.