आर्द्रता व ढग

निरपेक्ष आर्द्रता

views

4:40
“एक घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण, म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय.” आर्द्रता मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. समुद्रीय प्रदेशात किंवा सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. तसेच विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी – कमी होत जाते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांच्या वितरणावरून निरपेक्ष आर्द्रतेवर फरक पडतो. उदा. ऋतुमानाचाही निरपेक्ष आर्द्रतेवर परिणाम होत असतो. सापेक्ष आर्द्रता :-“एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर, म्हणजे, ‘सापेक्ष आर्द्रता’ होय.” सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत सांगितली जाते. सूत्र :- सापेक्ष आर्द्रता (%) = (निरपेक्ष आर्द्रता )/(बाष्पधारणक्षमता) x १००