ऐतिहासिक काळ

नद्यांच्या खोरयांमधील नागरी संस्कृती

views

3:08
नवाश्मयुगातील संस्कृती या कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. म्हणजेच शेतीवर अवलंबून होत्या. मुलांनो, शेती चांगल्या प्रकारे करण्यासाठी किंवा जास्त उत्पादन येण्यासाठी सुपीक जमीन आणि बारा महिने म्हणजेच वर्षभर पाण्याची आवश्यकता असते. आणि हे सर्व नदी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशात उपलब्ध असल्याने साहजिकच नवाश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठावर गावे वसविली. त्यामळे नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवाश्मयुगीन संस्कृतींचा विकास झाला. विविध कला-कौशल्यांचा उपयोग करून उत्पादनातील वाढ, चाकाचा उपयोग, व्यापारातील झालेली प्रगती, नवनव्या विकसित झालेल्या लिपींचा उपयोग इ. गोष्टींमुळे नवाश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. संपूर्ण जगातील ४ प्रदेशांमध्ये एकाच कालखंडात म्हणजे इसवी सनापूर्वी सुमारे ३००० वर्षांपूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. या संस्कृती नद्यांच्या काठांवर विकसित झाल्या म्हणून त्यांना ‘नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती’ असे म्हणतात.