पाणी

माहीत आहे का तुम्हाला?

views

4:22
माहीत आहे का तुम्हाला? : मुलांनो, आपण पाहिले की नदीचे पाणी हे वाहते असते. त्यामुळे आपोआपच त्या पाण्याचे शुद्धीकरण होत असते. परंतु नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी म्हणजेच पाणी अशुद्ध करणारे घटक मिसळले, तर नदीच्या पाण्याची शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया हळूहळू कमी होते. पाण्याचे शुद्धीकरण: मुलांनो, या आधीच्या इयत्तांमध्ये आपण पाणी शुध्द करण्याच्या अनेक प्रक्रिया पाहिल्या आहेत. आता आपण पाणी शुध्द करण्याच्या नवीन प्रक्रिया पाहू. यासाठी एक प्रयोग करा. प्रथम एक मोठी पारदर्शक असलेली प्लास्टिकची बाटली घ्या. त्या बाटलीचा तोंडाकडील भाग व खालील भाग वेगळा होईल अशा पद्धतीने ती कापून घ्या. आता त्या बाटलीच्या तोंडाला एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधा. तोंड बांधलेल्या बाटलीचा भाग खालच्या बाटलीवर उलटा ठेवा. नंतर बाटलीत प्रथम कोळशाची पूड, बारीक वाळू व जाड वाळू अशा पद्धतीने थरावर थर भरून ठेवा. आता कचरा असलेले गढूळ पाणी बाटलीत हळूहळू भरा. जलशुद्धीकरण केंद्र: मुलांनो, प्रत्येक गावाला पाणीपुरवठा करणारे विविध स्त्रोत असतात. उदा: नदी, ओढा, तलाव, धरण यांसारख्या पाणीसाठ्यातून पाणी पुरवठा केला जातो. ह