वर्तुळ

उदाहरणे (1)

views

3:09
उदाहरणे: मुलांनो, आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदा:1) एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे. तर त्याचा परीघ काढा. हे पाहा, या उदाहरणात इथे व्यास (d) = 14 सेमी दिला आहे. म्हणून आता त्या वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी आपण πd या सूत्राचा वापर करणार आहोत. म्हणजेच c = πd आता या सूत्रात किमती ठेवूया. इथे π ची किंमत दिली नसल्यास आपल्याला ती किंमत 22/7 घ्यायची आहे. c = πd c = 22/7 x 14 (7 ने 14 ला भागले असता उरलेल्या संख्यांचा गुणाकार करू). c = 44 सेमी म्हणून वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे.