सांख्यिकी

चला चर्चा करूया.

views

5:22
चला चर्चा करूया. उदा. एका आठवड्यात सातही दिवस दोरीच्या उड्यांचा सराव ऋतुजा करत होती. प्रत्येक दिवसात तिने एका मिनिटामध्ये मारलेल्या दोरीच्या उड्यांची संख्या दिली आहे 60,62,61,60,59,63,58. तर तिने एका मिनिटात सरासरी किती उड्या मारल्या? उत्तर: पहा, आता आपल्याला सरासरी काढण्यासाठी सर्वात प्रथम ऋतुजाने सात दिवसात मारलेल्या उड्यांच्या सर्व संख्यांची बेरीज करून, त्या आलेल्या उत्तराला एकूण दिवसांनी भागून घ्यावे लागेल. म्हणून सरासरी = (सात दिवसात मारलेल्या उड्यांची बेरीज )/(एकूण दिवस) = (60+62+61+60+59+63+58 )/7 सरासरी = 423/7 सरासरी = 60.42 म्हणून प्रत्येक दिवशी एका मिनिटात मारलेल्या उड्यांची सरासरी 60.42 एवढी आहे. ज्या संख्येबद्दल माहिती हवी आहे, तिचे जेवढे नमुने आपल्याला दिलेल्या सामग्रीत मिळतात, त्यांना प्राप्तांक असे म्हणतात. ऋतुजाने कोणत्याही दिवसात अपूर्णांकात उड्या मारल्या नाहीत. पण तरीही सरासरी अपूर्णांकात येऊ शकते. तर मुलांनो, ह्या सर्व उदाहरणांचे तुम्ही निरीक्षण केलेत तर तुम्हाला असे दिसून येईल की सरासरी काढण्यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करावा लागतो तो म्हणजे, सरासरी= (दिलेल्या माहिती मधील सर्व प्राप्तांकाची बेरीज)/(एकूण प्राप्तांकाची संख्या ) आता आपण या सूत्राचा वापर करून सरावासाठी आणखी काही उदाहरणे सोड्वूया.