मौर्यकालीन भारत

ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी(भाग 1)

1588 views
16
3:59
ग्रीक सम्राट अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर हा मॅसेडोनिया देशाचा राज्यकर्ता होता. जागतिक इतिहासात तो सर्वांत यशस्वी व कुशल सेनापती गणला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने इराण, सीरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, फिनीशिया, जुदेआ, गाझा, बॅक्ट्रिया तसेच भारतातील पंजाबपर्यंतचा प्रदेश जिंकला होता. इ.स.पू. ३२६ मध्ये म्हणजे आजपासून जवळ-जवळ २००० ते २५०० वर्षापूर्वी त्याने भारतावर स्वारी केली. त्यावेळीचा भारत हा आजच्या पाकिस्तानपर्यंत वायव्येला पसरलेला होता. अलेक्झांडर आपल्या तुकडीला घेऊन नीसा या प्राचीन शहराच्या भेटीस गेला आणि तेथून तो सिंधू नदीकडे वळला. सिंधूनदीवर पूल बांधला होता. ग्रीक सैन्य हा पूल पार करून तक्षशिलेला पोहोचले. तक्षशीला हे शहर प्राचीन व्यापाराच्या दृष्टीने एक महत्वाचे शहर होते. तसेच तक्षशीला विद्यापीठही याच ठिकाणी असल्याने ते शैक्षणिक केंद्र होते. आज तक्षशीला हे ठिकाण पाकिस्तान या देशात आहे. तर ग्रीक राजा सिकंदर हा भारतावर स्वारी करून येत असताना त्याला अनेक प्रदेशातील राजांबरोबर युद्ध करावे लागले, त्यांचा सामना करावा लागला. भारतात येण्याचा त्याचा मार्ग सोपा नव्हता, तर तो खूप खडतर होता. तरीही त्याने भारतीय राजांशी समर्थपणे लढा दिला व तो पंजाब पर्यंत पोहचला.