भरती- ओहोटी

केंद्रोत्सारी बल व गुरुत्वीय बल

views

2:47
आता आपण केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वीय बल यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास करूया. केंद्रोत्सारी बल :- पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. या परिवलनामुळे पुथ्वीला एक प्रकारचे बल किवा प्रेरणा मिळते. ही प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणतात. गुरुत्वीय बल :- गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तूला आपल्याकडे खेचणे. पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणाच्या गुणधर्मामुळे कोणतीही वस्तू अवकाशात फेकली असता पुन्हा ती जमिनीवरच येते. आपण पाहिले की पृथ्वीवरील कोणतीही वस्तू केंद्रोत्सारी प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते; परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेत कार्य करीत असते. हे बल केंद्रोत्सारी प्रेरणेच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असते. त्यामुळे भूतलावरील कोणतीही वस्तू आहे त्या जागी राहते.