वारे

हवेचा दाब

views

3:59
आकृतीच्या सहाय्याने आपण पृथ्वीवरील हवेच्या दाबाची माहिती घेणार आहोत. आपल्याला यामध्ये बाणाच्या साहाय्याने वाऱ्याची दिशा दाखवली आहे. वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे क्षितिजसमांतर वाहत असतात. आकृतीमध्ये आपल्याला जे लाल ऑरो दिसत आहेत ते आपल्याला जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा दाखवत आहेत. तसेच पृथ्वीच्या परिवलनामुळे ही वाऱ्यांची दिशा बदलली जाते. आकृती मधील निळे ऑरो आपल्याला परिवलनामुळे वाऱ्याची दिशा कशी बदलते हे दाखवतात. अशा पद्धतीने वारे कमी दाबाकडून जास्त दाबाकडे वाहत जातात व वाऱ्याची निर्मिती होते. या वाऱ्याला किवा हवेला एक प्रकारचा दाब किवा तीव्रता असते. हवेच्या दाबातील फरक ज्या ठिकाणी कमी असतो, तेथे वारे मंद वाहतात. आणि ज्या ठिकाणी हवेतील दाबाचा फरक जास्त असतो तेथे वारे वेगाने वाहतात. म्हणूनच तेथे सोसाट्याचा वारा सुटतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रती तास किंवा नॉट्स या एककात मोजतात. आपण संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वी परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. जसे या आकृमध्ये दाखवले आहे. आकृतीत या दिशा वक्र बाणाने दाखवल्या आहेत