वारे

हंगामी वारे

views

3:39
ऋतुमानानुसार जमीन आणि पाणी यांच्या तापण्याचे प्रमाण कमी अधिक असते. त्यामुळे मोसमी वाऱ्याची निर्मिती होते. हिंदी महासागर आणि अरबी समुद्र यावरून नैऋत्य दिशेने भारताच्या बाजूला वाहणारे हे वारे असतात. हे वारे एका विशिष्ट काळात पाऊस घेऊन येत असल्याने यांना मौसमी वारे असे म्हटले जाते. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. भारतीय उपखंड व त्यांतील देशात या वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो. भारतीय उपखंडात उन्हाळा आणि हिवाळा याचबरोबर पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतूही होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते. विषुववृत्त ओलांडून हे वारे नैऋत्य दिशेने भारताच्या किनाऱ्यावर जून ते सप्टेंबरमध्ये येऊन धडकतात. हे वारे नैऋत्य दिशेने वाहत येतात म्हणून त्यांना नैऋत्य मोसमी वारे असेही म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात म्हणूनच आपल्याला त्यापासून पाऊस मिळत असतो.याउलट सप्टेंबर ते डिसेंबरपर्यत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. हे वारे कोरडे असतात व ईशान्य मोसमी वारे या नावाने ओळखले जातात.