वितरणाचे नकाशे

टिंब पद्धत

views

3:31
सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना म्हणजे मोजून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला असेल, तशाच तऱ्हेने नकाशात टिंब देऊन दाखविले जाते. उदा. नकाशा ज्या प्रदेशाचा तयार करणार आहोत, त्या प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन, संस्था वितरण इत्यादी. टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे, अशा भागातील लोकसंख्या (.) या टिंबाने दाखविली आहे. ज्याचे मूल्य 10,000 लोकसंख्या इतकी आहे. म्हणजे (.) असे टिंब असणाऱ्या भागात 10,000 लोक आहेत असा याचा अर्थ होतो. तर त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रमुख नगरांची लोकसंख्या वाढत – वाढत जाणाऱ्या टिंबांच्या साहाय्याने पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंत दाखविली आहे. हे ठरविण्यासाठी प्रथम आपल्याला अमरावती शहरातील कमीत कमी व जास्तीत जास्त लोकसंख्या विचारात घ्यावी लागेल. त्यानुसारच टिंबाचे मूल्य ठरवले जाते. उदा. अमरावती शहरातील एखाद्या प्रदेशातील सर्वात कमीत कमी लोकसंख्या ही 10,000 आणि जास्तीत – जास्त 5 लाख पर्यंत आहे. त्यावरुनच टिंबाचे मूल्य ठरवले आहे. हे मूल्य ठरविताना टिंबांचे आकारमान, घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो. प्रत्येक उपविभागातील (प्रशासकीय सीमा) घटकांच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावीत हे आधी ठरवावे लागते.