वितरणाचे नकाशे

क्षेत्राची निवड

views

3:36
भौगोलिक क्षेत्रभेट ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते. उदा. :- प्राकृतिक भूरूपे यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या, नदीकिनारा, समुद्रकिनारा इत्यादी गोष्टी येतात. पर्यटनस्थळे: यामध्ये धबधबे, गरम पाण्याचे झरे, थंड हवेची ठिकाणे यांचा समावेश होतो. भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय, जसे मुंबई मधील नेहरू तारांगण, मत्स्यालय. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तेथील स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी लागते. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणच्या भेटीसाठी आवश्यक असणारी परवानगीपत्रे घावी. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी नोंदवही घ्यावी. आपण काय पाहिले ते नंतर आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून महत्त्वाची व आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली – त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांकडून आर्थिक माहिती मिळविण्यासाठी प्रश्नावली आवश्यक असते. तसेच पेन, पेन्सिल, मोजपट्टी, होकायंत्र – दिशा समजण्यासाठी, नमुना गोळा करण्यासाठी पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बिण इ. वस्तू बरोबर घ्याव्या लागतात.