परिमेय संख्या व त्यावरील क्रिया

दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार

views

4:01
दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार – मुलांनो मागील इयत्तेत आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार यांची उदाहरणे अभ्यासली. चला तर मग, या उदाहरणांच्या निरीक्षणातून आपण काही नियम समजावून घेऊ. दशांश अपूर्णांकाला 10, 100, 1000 या संख्यांनी गुणताना दशांश चिन्ह अनुक्रमे एक घर, दोन घरे, तीन घरे उजवीकडे सरकतात. उदा. 1) 0.425 × 10 = 4.25 पहा, यामध्ये आपण 10 ने गुणले म्हणून दशांश चिन्ह उजवीकडून सुरवात करून एक घरानंतर म्हणजेच 4 या संख्येनंतर लिहिले. 2) 0.425 × 100 = 42.5 या उदाहरणात आपण 100 ने गुणले म्हणून दशांश चिन्ह उजवीकडून सुरवात करून दोन घरांनंतर म्हणजेच 42 या संख्येनंतर लिहिले. 3) 0.425 × 1000 = 425 या उदाहरणात आपण 1000 ने गुणले म्हणून दशांश चिन्ह उजवीकडून सुरवात करून तीन घरांनंतर लिहिण्याची गरज आहे. परंतु ही तीन अंकी संख्या असल्याने येथे दशांश चिन्ह आहे असे अपेक्षित असते म्हणून ते दिले नाही. याचप्रमाणे दशांश अपूर्णांकाला 10, 100, 1000 या संख्यांनी भाग देताना दशांश चिन्ह अनुक्रमे एक घर, दोन घरे, तीन घरे डावीकडे सरकते.