परिमेय संख्या व त्यावरील क्रिया

पदावलीची उदाहरणे

views

3:25
पदावलीची उदाहरणे: तर मुलांनो आपण सरावासाठी काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1 : 50 × 5 ÷ 2 +24 = 250 ÷ 2 + 24 इथे गुणाकार ही क्रिया डावीकडून पहिली आली आहे म्हणून गुणाकार केला. = 125 + 24 आता इथे भागाकार ही क्रिया डावीकडून पहिली आली आहे म्हणून भागाकार केला. = 149 आता 125 व 24 ची बेरीज केली असता उत्तर आले 149 म्हणून 50 × 5 ÷ 2 +24 = 149 उदाहरण 2 : ( 13 × 4) ÷ 2 – 26 = 52 ÷ 2 -26 प्रथम डावीकडील पहिली क्रिया म्हणजे गुणाकार करून कंस सोडवला. = 26 – 26 नंतर भागाकाराची क्रिया केली असता संख्या मिळाली 26. = 0 26 मधून 26 वजा केले असता उत्तर आले शून्य म्हणून ( 13 × 4) ÷ 2 – 26 = 0