स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

जावळीचे चंद्रराव मोरे

views

2:47
शिवरायांनी स्वराज्याचे कार्य करीत असताना शत्रूंचाही बंदोबस्त केला होता. त्यांच्या कार्याचे मोठेपण साऱ्या मावळ्यांना पटले. त्यांचे नाव सर्वत्र गाजायला लागले. शिवरायांना लोकांनी राजे केले. लोक आपला राजा म्हणून शिवरायांकडे पाहू लागले. अगदी कमी वयात एवढे मोठे कार्य व एवढी लोकप्रियता त्या प्रदेशात भल्याभल्यांनाही मिळाली नव्हती. त्यामुळे शिवराय काही लोकांच्या डोळ्यांत खुपू लागले. त्यापैकीच एक म्हणजे सातारा शेजारील जावळीचे मोरे होते. मोरे हे जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना नदीच्या खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्या आदिलशाहाचे जहागीरदार होते. आदिलशाहाने त्यांना ‘चंद्रराव’ हा किताब, म्हणजे पदवी दिली होती. जावळीचे जंगल घनदाट होते. भरदिवसा सूर्याची किरणे त्याठिकाणी पोहोचू शकत नव्हती. अतिशय दाट झाडे, झुडुपे त्या जंगलात होती. तसेच त्या जंगलामध्ये वाघ, लांडगे, अस्वले यासारखी हिंस्त्र प्राणीही होते. त्यामुळे मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जावळीच होती! असे असल्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे. तशी हिम्मत कोणाचीही होत नसे. पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी.