स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

बंड केलिया मारले जाल

views

3:46
शिवरायांनी यशवंतराव मोरेला समज देण्याच्या उद्देशाने एक पत्र लिहिले. त्यात ते लिहितात. “यशवंतराव मोरे तुम्ही स्वतःला राजे म्हणवून घेता. तुम्ही जसे राजे आहात तसेच आम्हीही राजे आहोत. आम्हाला तर श्रीशंभूने राज्य दिले आहे. त्यामुळे खरे राजे तर आम्ही आहोत. तर तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेऊ नये.” अशा प्रकारचे पत्र त्यांनी यशवंतराव मोरेला लिहिले. यशवंतराव खूप उद्धट होता. राजेपणाची हवा त्याच्या डोक्यात शिरली होती. यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणाने शिवरायांना पुढील अर्थाचे उत्तर लिहिले. “शिवराय तुम्ही काल राजे झाले आहात. तुम्हास राज्य कोणी दिले ? म्हणजे शिवराय हे राजे आहेत. त्यांचे छोटेसे का होईना राज्य आहे. हे यशवंतराव मान्य करीत नव्हता. पुढे पत्रात तो शिवरायांना म्हणतो, तुम्ही जर जावळीला आलात तर आमच्या जाळ्यात तुम्ही फसले जाल. आम्हांला हे राज्य श्रींचे कृपेने विजापूरच्या आदिलशहाने दिले आहे. तसेच त्याने आम्हाला राजाचा किताब दिला आहे. आमच्याकडे राजाची मानाची छत्री, राजाचे सिंहासन आहे. हे सर्व आम्हाला आदिलशाहाने खुश होऊन दिले आहे. हे एवढे सगळे आमच्याकडे असताना तुम्ही जर आम्हाला त्रास देण्याचा किंवा आमच्या वाटयाला जाण्याचा प्रयत्न केला तर त्यात तुमचेच नुकसान होईल.” अशा प्रकारे यशवंतरावाने पत्राद्वारे शिवरायांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांनी पत्रातून त्याला टोला दिला. “यशवंतराव तुम्ही जावळी सोडून, स्वत:ला राजा म्हणून न घेता, राजाची छत्री दूर करून, सिंहासन सोडून, हात रुमालाने बांधून, शांतपणे आमच्या दरबारात येऊन आमची चाकरी करा. हे न करता जर तुम्ही आमच्या विरुद्ध जाऊन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर आमच्या हातून तुम्ही मारले जाल.” शिवरायांनी अशी समज देऊनही यशवंतराव ना शरण आला, ना त्याने आपल्या करामती बंद केल्या. शेवटी शिवरायांनी जावळीवर स्वारी करण्याचे ठरविले.