शर्थीने खिंड लढवली

पन्हाळगडाचा वेढा

views

03:06
विजापूर दरबारातील शूर सरदारांपैकी एक शूर सरदार म्हणजे सिद्दी जौहर. हा शूर पण क्रूर होता. तो कोणाला दया, माया दाखवत नसे. आपले काम करण्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असे. त्याची सैन्यातील शिस्त कडक होती. त्याने पन्हाळगडाला चारही बाजूने वेढा दिला. वेढा एवढा कडक होता की आत मुंगीही जाऊ शकत नव्हती. त्यावेळी शिवराय पन्हाळगडावरच होते. सिद्दीच्या वेढयामुळे शिवराय आत कोंडले गेले. महाराजांना गडावरून बाहेर पडण्यास मार्ग मिळत नव्हता. थोडयाच दिवसांत पावसाळा सुरू होणार होता. पावसाळा सुरू झाला की सिद्दी वेढा उठवील असे शिवरायांना वाटले. पावसात सिद्दीचे सैन्य काय पहारा देतील असे शिवरायांना वाटले. पण झाले उलटेच. पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता काय करावे? शिवरायांपुढे मोठा प्रश्न पडला. मुलांनो पूर्वीच्या काळी गडांवर अन्नधान्य साठविण्यासाठी कोठारे असत. कधी असा वेढा गडाला पडला, तर त्या अन्नधान्याचा वापर केला जात असे. ते अन्नधान्यही आता संपत आले होते. आता काही तरी केले पाहिजे हे शिवरायांनी ओळखले. सिद्दीच्या सैन्याशी लढावे, तर सिद्दीचे सैन्य अफाट व युद्ध साहित्यांनी सज्ज होते. तर शिवरायांचे सैन्य मूठभर होते. लढाई करायची म्हटले तर आपल्याला पराभव पत्करावा लागेल. आजपर्यंत स्वराज्यासाठी केलेले सर्व कार्य वाया जाईल हे शिवरायांनी ओळखले. म्हणून त्यांनी शक्तीने नव्हे तर युक्तीने सुटका करून घेण्याचे ठरविले. शिवरायांनी लगेच सिद्दीला निरोप पाठवला, “लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो”. शिवाजीचा निरोप ऐकून सिद्दी खुश झाला. त्याने ते मान्य केले. अनेक दिवसांच्या वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. त्यांनी आपल्या कामात कोणतीही हयगय केली नव्हती. अतिशय कडक पहारा दिला होता. आता शिवाजी शरण येत आहे, हे ऐकून त्यांना आनंद झाला.