इतिहास आणि कालसंकल्पना

इसवी सनाचा काळ व इसवी सनापूर्वीचा काळ

views

3:54
इसवी सनाचा काळ : एकरेखिक विभागणीमध्ये एकापाठोपाठ येणाऱ्या वर्षांमध्ये काळाची विभागणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकांमध्येही एकापाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एकरेखिक पद्धतीने क्रमाक्रमाने मांडलेली असते. त्यासाठी इसवी सनाचा वापर केला जातो. याठिकाणी जर आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मांडणी केली तर ती अशी होईल: इ.सन १६०० साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. १८५७ मध्ये राष्ट्रीय उठाव झाला. १८८५ ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. १९२० पासून १९४७ पर्यंत गांधीयुग होते. आणि १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. ही झाली एकरेखिक पद्धतीने व क्रमाने घडलेल्या घटनांची साखळी. आपण ज्याला दिनदर्शिका किंवा कॅलेंडर म्हणतो ते इसवी सनावर आधारित असते. इसवी सनापूर्वीचा काळ : इसवी सनाप्रमाणे काळ मोजण्यास सुरूवात होण्यापूर्वीच्या काळाला ‘इसवीसनपूर्व काळ’ असे म्हणतात. या काळातील वर्षे मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या क्रमाने मांडली जाते. जसे १००० – ५०० – १००. किंवा १०,९,८,७,६,५,४,३,२,१ इत्यादी. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरवात इ.स.पू. १०० या वर्षी झाली. आणि ते इ.स.पू. १ यावर्षी संपले. तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरवात इ.स.पू. १००० या वर्षी झाली. म्हणून इ.सनापूर्वीचा पहिल्या १०० वर्षाचा काळ म्हणजे इसपूर्व पहिल्या शतकाचा काळ होय. म्हणजेच इ.स.पू. १०० ते १ होय. आणि इ.सनापूर्वीच्या पहिल्या सह्स्त्रकाचा काळ म्हणजे इ.स.पू.१००० ते १ होय.