इतिहास आणि कालसंकल्पना

इतिहासाची कालविभागणी

views

1:55
: इतिहास म्हणजे भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र होय. म्हणजे भूतकाळ हाच इतिहासाचा काळ आहे. थोडा खोलवर विचार केला तर इतिहासाचा काळ हा सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळापर्यंत मागे जातो.सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी म्हणजेच ४५० कोटी वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह आहे. याचाच अर्थ पृथ्वीची उत्पत्तीसुद्धा साडेचार अब्ज वर्षापूर्वी झाली. आपल्याला जर पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर एवढा मोठा काळ एकदम समजून घेणे अवघड आहे. म्हणून तो टप्प्या – टप्प्याने समजून घेणे आवश्यक असते. यासाठी इतिहासाची विभागणी केली जाते. त्याचे प्रामुख्याने दोन टप्पे मानले जातात. १)प्रागैतिहासिक काळ २) ऐतिहासिक काळ १)प्रागैतिहासिक काळ : यातील ‘प्राग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘प्राक्’ या शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ ‘पूर्वीचा’. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्या काळाला ‘प्रागैतिहासिक काळ’ म्हणतात उदा. अश्मयुगीन मानवाचा इतिहास. २)ऐतिहासिक काळ : ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध असतात, त्या काळाला ऐतिहासिक काळ म्हणतात.