ओळख भारताची

भारताची प्राकृतिक रचना

views

5:12
तुम्हाला माहीतच आहे की, आपला भारत देश नैसर्गिक साधन संपत्तीने स्वयंपूर्ण आहे. आता आपण ह्या नकाशाच्या आधारे भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करूया. त्यासाठी काही प्रश्नांची उत्तरे दया. नकाशातील पर्वत शोधून त्यांची नावे सांगा बरं!हिमालय, सह्याद्री, सातपुडा, निलगिरी, विंध्य, गिरनार, लडाख, अरवली. हे पर्वत जणू आपल्या देशाचे पहारेदारच आहेत. आता तुम्ही मला नकाशातील डोंगरांची नावे सांगा. अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, सातमाळा, महादेव, मैकल, नल्लामल्ला. आता तुम्ही मला नकाशातील पठारांची नावे सांगा. छोटा नागपूरचे महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार, मेवाड पठार, माळवाचे पठार, कर्नाटक पठार. शि: खूपच छान. ही पठारे म्हणजेच भारताचे वैभव आहे. आता सांगा हिमालयातून उगम पावणाऱ्या सिंधू नदीस कोणत्या नद्या सिंधू नदीस मिळतात. उंचीचा विचार करून वाहण्याची दिशा कोणती ते सांगा. हिमालयातून उगम पावणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास या नद्या सिंधू नदीस मिळतात. उंचीचा विचार करता त्या पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे वाहतात,असे दिसते. कोरोमंडल किनाऱ्याला कोणत्या नद्या मिळतात? गोदावरी, कृष्णा, कावेरी. या नद्या कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळतात. बरं गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या खोऱ्याचा उतार कोणत्या दिशेकडून, कोणत्या दिशेकडे आहे? नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या उताराची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे तर वैनगंगा नदीच्या खोऱ्याच्या उताराची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि गंगा, गोदावरी, कावेरी, या नद्यांच्या खोऱ्यांची उताराची दिशा. पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. नकाशातील सरोवरांची नावे सांगा. लोणार, सांभर, उलर, वेंबनाड, पुलीकत, कोलेरू, चिलका ही सरोवरे नकाशात आहेत. नकाशातील आखातांची नावे सांगा? कच्छ, खंबात व मन्ना. ही आखाते भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? कच्छचे आखात व खंबातचे आखाते हे भारताच्या पश्चिम दिशेला तर मन्नारचे आखात हे भारताच्या दक्षिण दिशेला आहे. भारताच्या तिन्ही बाजूस जो जल भाग आहे त्याची नावे सांगा. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, आणि हिंदी महासागर.