ओळख भारताची

भारताच्या सीमा व भारतातील विविधता

views

3:34
आपला देश विविध नद्या, पठारे, पर्वत, मैदाने, बेटे इत्यादींनी नटलेला आहे. आता आपण भारताच्या सीमा व भारतातील विविधता यांची माहिती घेऊया. भारताच्या तिन्ही दिशेला पाण्याने व्यापलेला भाग आहे. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर आहे. दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘भारतीय द्वीपकल्प’ असे म्हणतात. भारताच्या उत्तरेकडील सीमा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. भारतातील विविधता :- आपल्या देशामध्ये विविध वने, वाळवंटे, मैदाने, नद्या, पर्वत, पठारे आहेत. आपल्या देशाचा विस्तार खूप मोठा आहे. समुद्रसपाटीपासून उंचीतला फरक हा ८००० मीटरपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे भारताच्या विविध प्रदेशांत वेगवेगळे हवामान आढळून येते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या आकारात, रचनेत विविधता आढळून येते. तसेच या हवामानामुळे पिकांमध्ये सुद्धा विविधता आढळते. उत्तर भारतामध्ये ‘गहू’ हे प्रमुख पीक आहे. तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात ‘भात’ हे प्रमुख पीक आहे. तर मध्य भारतामध्ये ज्वारीचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. या विविधतेचा आपल्या जीवनमानावर, चालीरीतींवर, परंपरेवर, लोकजीवनावर व संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. मुलांनो, आणखीन कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळून येते?