स्थिर जीवनाची सुरुवात

खास कौशल्ये आणि विविध व्यवसाय

views

3:07
शेती सुरु होण्यापूर्वीच्या काळात माणूस शिकार करत असे. फळे – कंदमुळे गोळा करत असे. यासाठी त्यांना सतत भटकंती करावी लागे, म्हणजेच फिरावे लागत असे. कंदमुळे ही जमिनीच्या आत असतात. जमीन खोलवर खणून मग ती कंदमुळे काढतात. तर त्या काळात ही फळे किंवा कंदमुळे अन्न म्हणून जास्त कालावधीसाठी साठवणे शक्य नव्हते. त्यामुळे ते लोक, म्हणजेच स्त्री – पुरुष फक्त अन्न मिळविण्याच्या कामात सतत गुंतलेले असत. नंतर शेतीच्या शोधामुळे ह्या लोकांचे जीवन स्थिर झाले. म्हणजेच ते एका ठिकाणी समूहाने राहू लागले. शेतात पिकवलेले अन्न दीर्घ मुदतीसाठी साठवता येणे त्यांना शक्य झाले. गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य मिळू लागले, त्यामुळे समूहातील स्त्री – पुरुष नवीन गोष्टींचा शोध घेऊ लागले. प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी कौशल्य हे असतेच. त्याच कौशल्याचा व कल्पकतेचा वापर करू लागले. त्या आधारे नवीन कौशल्ये विकसित करण्यासाठी त्या काळातील स्त्री – पुरुषांना वेळ मिळू लागला. कौशल्ये आत्मसात केलेल्या व्यक्तीकडे त्यांच्या कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. त्यामुळे त्यातून पुढे मातीची भांडी बनवणारे, मणी बनवणारे कारागीर तयार झाले. नवाश्मयुगातील मातीची भांडी आणि मातीच्या वस्तू ह्या स्त्रियांनीच हातांनी घडवलेल्या होत्या असे मानले जाते.