स्थिर जीवनाची सुरुवात

परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन

views

2:56
शेतीची सुरुवात झाल्यामुळे गावातील शेतकरी आवश्यकतेपेक्षा जास्त धान्य पिकवत होते. शेतीची कामे करत असताना त्यांना त्यासाठी लागणारी अवजारे बनवणे, ती दुरुस्त करणे या आणि इतर कामांसाठी कुशल कामगारांची गरज होती. त्यावेळी रुपये किंवा पैसे यांसारखे चलन नसल्यामुळे कारागिरांना केलेल्या कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरुपात दिला जाई. कारागीर ज्या विविध वस्तू बनवत असत, त्यासाठी लागणारा कच्चा माल दुरून आणावा लागत असे. त्या वस्तूंची किंमतही अन्नधान्य किंवा वस्तू यांच्या देवाणघेवाणीतूनच चुकवली जात असे. यातूनच पुढे खरेदी आणि विक्री यासाठी विनिमयाची पद्धत रूढ झाली. कच्चा माल आणणे, तयार झालेल्या वस्तू आणणे किंवा दैनंदिन म्हणजे रोजच्या उपयोगाच्या अन्य वस्तू इत्यादी इतर ठिकाणांहून आयात करण्याची गरज भासू लागली. त्यावेळी विनिमयाची हीच पद्धत उपयोगात आणली जात असे.