पुरंदरचा वेढा व तह

पुरंदरला मुघलांचा वेढा

views

4:14
पुरंदरला मुघलांचा वेढा: पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. पुणे जिल्ह्यातील सासवडपासून अगदी जवळ असलेला किल्ला म्हणजे पुरंदर होय. पुरंदरवरच संभाजीराजे यांचा जन्म झाला होता. असा हा बळकट व मजबूत किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचे साम्राज्य नष्ट होऊ शकणार नाही, हे दिलेरखानाला माहीत होते. त्यामुळे त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. दिलेरखान प्रचंड फौज घेऊन आला होता. पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी हा मोठा जिद्दीचा वीर होता. त्याच्या हाताखालचे शिपाईही मोठे शूर व पराक्रमी होते. या साऱ्या शिपायांच्या बरोबर मुरारबाजी दिलेरखानाच्या फौजेपुढे लढाईला उभा राहिला. किल्ल्याचा किल्लेदार मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने आपल्या सर्व मावळ्यांना एकत्र बोलाविले. त्यातील निवडक पाचशे मावळे त्याने आपल्या सोबत घेतले. त्या निवडक सैन्यासह त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला. त्याने बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला. ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघल सैन्यावर अक्षरश: तुटून पडले. थोडा वेळ जबरदस्त लढाई झाली. मुरारबाजी प्राणानिशी लढत होता. तलवार हातात घेऊन तो वाऱ्याच्या वेगाने शत्रूशी लढत होता. मुघलांचे सैन्य खूप होते. तरीही मराठ्यांनी त्या सैन्याचा संपूर्णतः पराभव केला. त्यांना सळो की पळो करून सोडले. अखेर मुघलांनी माघार घेतली. ते दिलेरखानाच्या छावणीकडे आपला जीव वाचविण्यासाठी भीतीने पळत सुटले.