पुरंदरचा वेढा व तह

पुरंदरचा तह:

views

3:17
हत्तीवर अंबारीत बसलेल्या दिलेरखानाला पाहून मुरारबाजी चवताळला. “कापा, तोडा, मुडदे पाडा” असे म्हणत तो शत्रूवर धावून गेला. त्याची तलवार आणखी जास्तच वेगाने फिरू लागली. त्या तलवारीसमोर जो कोणी आला तो ठार झाला. या एकट्या वीराला पाहून मुघलांनी त्याला चारी बाजूंनी घेरले. पण त्याला मुरारबाजीने आपल्या उत्तरातून महाराजांबद्दलचे प्रेम दाखवून दिले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला ‘अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे! तू दिलेला कौल किंवा सरदारकी आम्ही घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? शिवाजी महाराजांसारखा दयावान राजा असताना आम्हांला तुझी भीक नको आहे. तुझ्या बादशाहाची जहागीर हवी कोणाला?” असे म्हणत मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो परत शत्रूवर तुटून पडला. मुरारबाजी गेल्याची बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दु:खी झाले. आधी बाजीप्रभू आता मुरारबाजी असे हे माझे शूर मावळे एकेक करून मृत्यूमुखी पडू लागले, तर त्या जिंकलेल्या किल्ल्यांना काहीही महत्त्व नाही. त्यांनी विचार केला, एकेक किल्ला लढवत ठेवायचा म्हंटले तर आपल्याकडे एवढे शूर मावळे व सरदार आहेत की आपण वर्षवर्षभर लढवत ठेवू, पण विनाकारण आपली सोन्यासारखी माणसे मरतील. किल्ला आज गेला तर उद्या घेऊ, पण एकदा गेलेली माणसे आपण परत मिळवू शकणार नाही.