रयतेचा राजा

कडक शिस्त

views

3:33
महाराजांचे हेर खाते हे अतिशय सक्षम होते हे आपण पाहिले आहेच. त्यांचे हेर हे फक्त परराज्यातील किंवा शत्रूच्या राज्यातीलच माहिती मिळवित होते असे नाही, तर ते आपल्या स्वराज्यातही कुठे काय चालले आहे, याची सर्व माहिती शिवरायांना देत. आपल्या राजाला धोका देऊन शत्रूला जाऊन मिळणे किंवा मदत करणे याला फितुरी असे म्हणतात. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, रयतेला लुटू नये, आपल्या राज्यातीलच नव्हे तर स्वारीवर असताना परमुलुखातील रयतेलाही लुटू नये अशी त्यांची सैन्याला सक्त ताकीद होती. हा नियम कोणी मोडला तर त्याला कडक शिक्षा केली जात असे. दिलदार शिवराय :- शिवराय पराक्रमाने शूर, थोर होतेच, तसेच मनानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याचे कार्य करीत असताना सर्व जातीजमातींच्या, धर्मांच्या लोकांना जवळ केले. शिवरायांचे आरमार हे भक्कम होते. ते ज्यांच्या जीवावर उभारले होते ते लोक कोळी, भंडारी अशा विविध जातींचे होते. तसेच त्यात मुस्लिमही होते. महार, रामोशी इ. जातीतील मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. त्यांच्या पायदळातील नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता. महाराजांच्या आरमारदलातील प्रमुख अधिकारी दौलतखान व सिद्दी मिसरी, तसेच महाराजांचा स्वत:चा वकील काझी हैदर हे सर्वजण मुसलमान होते. पण हे सर्वजण स्वराज्याचे निष्ठावंत सेवक होते. कुतुबशहा हा मुस्लिम बादशाहा व छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजा. मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ म्हणजे कुरआन शरीफ होय. या ग्रंथाची एखादी प्रत त्यांना मिळाल्यास अतिशय सन्मानपूर्वक ते आपल्या सैन्यातील मुस्लिम सैनिकाकडे देत किंवा दुसऱ्या मुस्लिम व्यक्तीला देत. परंतु ती कधीही फाडून टाकली किंवा फेकून दिली गेली नाही. तशी ताकीदच महाराजांनी आपल्या सैनिकांना दिली होती. सैनिकही त्याचे काटेकोरपणे पालन करीत होते. महाराजांनी किंवा त्यांच्या सैनिकांनी लढाईत हाती लागलेल्या कोणत्याही स्त्रीच्या अब्रूस कधीही धक्का लागू दिला नाही. महाराज परस्त्री मातेसमान मानत.