रयतेचा राजा

उदार धार्मिक धोरण

views

4:47
उदार धार्मिक धोरण :- महाराजांचे धर्माबद्दलचे धोरण हे उदार होते. त्यांनी आपला शत्रू मुस्लिम आहे म्हणून कधीही कोणत्याही मुस्लिम व्यक्तीचा तिरस्कार केला नाही. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशाहाच्या चाकरीत होता. आदिलशाहाने त्याला स्वत:च्या मुस्लिम धर्मात घेतले. जन्माने हिंदू असलेला बजाजी आता मुस्लिम झाला. तो विजापुरातच राहू लागला. त्याला तेथे सर्व गोष्टींचा उपभोग घेता येत होता. त्याला कशाचीही कमतरता भासत नसे. पण आपण आपला धर्म बदलला याबद्दल त्याला मनातून वाईट वाटे. या गोष्टीचा विचार करून करून त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने परत आपल्या स्वधर्मात म्हणजे हिंदू धर्मात परत जायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर :- नेतोजी पालकर हे शिवरायांच्या सैन्याचे सेनापती होते. ते मोठे चपळ आणि शूर होते. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात होते. लोक त्यांना ‘प्रतिशिवाजी’ म्हणजेच ‘दुसरा शिवाजी’ असे म्हणत. “’महाराज मी दुसऱ्या धर्मात गेलो, पण मला आता परत आपल्या धर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा आपल्या धर्मात येता येणार?” शिवराय म्हणाले, “का नाही? तुमची इच्छा असेल, तर तुम्ही स्वधर्मात येऊ शकाल.” शिवरायांनी तत्परतेने शास्त्री आणि पंडित यांची बैठक भरवली. ते पंडितांना उद्देशून म्हणाले, “पंडित हो! नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहे. त्यांना अशा वेळी दूर करणे योग्य नव्हे व हा आपला धर्मही नव्हे. त्यांना जवळ घेणे हा आपला धर्म आहे.” ‘अशा प्रकारे १९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा स्वधर्मात घेतले. पुढे नेतोजी पालकराने अनेक वर्षे स्वराज्याची सेवा केली. मुलांनो, शिवरायांचे नाव आजही आदराने घेतले जाते याचे कारण आहे त्यांची दूरदृष्टी आणि दिलदारपणा, त्यांचा पराक्रम आणि त्यांचा मुत्सद्दीपणा.